बुलडाणा, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागपूर – सोलापूर महामार्ग रोखत आंदोलनाची तात्काळ दखल न घेतल्यास महावितरण कार्यालये होणार उध्वस्त होणार असा इशारा स्वाभिमानीच्या तुपकरांनी दिला आहे..
महावितरण प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिवसा विज मिळावी यासाठी गेल्या १० दिवसांपासून राजू शेट्टी कोल्हापुर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत. राज्य शासनाने अजूनही शेट्टींच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांचेसह कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आज चिखली जवळ पेठ फाट्यावर नागपूर – सोलापूर महामार्ग रोखून धरत तीव्र आंदोलन करण्यात आले. चांगलेच आक्रमक होत राजू शेट्टीच्या आंदोलनाची तात्काळ दखल न घेतल्यास आगामी काळात महावितरण कार्यालये उध्वस्त केली जातील असा गंभीर इशारा देत शेकडो कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी आंदोलन करीत महामार्ग रोखून धरला.
अगोदरच अतिपावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला असला तरी अतिपावसामुळे शेतशिवारातील विहिरींन बऱ्यापैकी पाणी आहे. त्यामुळे किमान रब्बीचा हंगाम तरी बरा येईल या आशेवर शेतकऱ्यांनी रब्बी वाणांची लागवड केली आहे. या परिसरात रात्री बेरात्री शेतीला पाणीपुरवठा सिंचनासाठी जावे लागते. रात्री जंगली श्वापदे, जनावरे, साप, विंचू आदींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. परंतु महावितरण प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिवसा पुरेसा वीज पुरवठा केला जात नाही, त्यामुळे शेतीसिंचानसाठी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात दिवसा विज पुरवठा द्या, या मागणीसाठी तुपकरांच्या नेतृत्वात स्वाभिमानीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी आज शुक्रवारी सकाळी नागपूर – सोलापूर महामार्ग रोखत रस्त्यावर उतरले आहेत.
या आंदोलनामुळे नागपूर – सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लक्षात घेता विद्यार्थ्यांन परीक्षा केंद्रावर पोचण्यात अडथळा होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी आंदोलकांकडून मुभा देण्यात आली होती. मात्र जोपर्यंत राजू शेट्टीच्या आंदोलनावर मार्ग निघत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका तूपकरांनी घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांची दखल न घेतल्यास राज्यभरातील महावितरणची कार्यालये उध्वस्त करू असा गंभीर इशारा आंदोलन स्थळावरून दिला आहे. एकंदरीतच तुपकरांच्या आक्रमक भुमिकेमुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/474270054357908