राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत अमळनेर येथील लाभार्थ्यांना धनादेश वाटप

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत एकूण 19 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे 3 लक्ष 80 हजार रक्कम लाभार्थ्यांना मंजूर झाल्याने आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सदर लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.

यावेळी आमदारांसह तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी मयत यशवंत धनगर यांचे वारस रत्नाबाई यशवंत धनगर रा.अमळनेर, मयत दिलीप बैसाणे यांचे वारस अलकाबाई दिलीप बैसाणे रा.शिरूड, मयत राजेंद्र बाळू पाटील यांचे वारस भारती राजेंद्र पाटील रा.अमळनेर, मयत शिवाजी सुकदेव पाटील यांचे वारस ज्योती शिवाजी पाटील रा.हेडावे, मयत बद्दु काका वंजारी यांचे वारस पमीबाई बद्दु वंजारी रा.रामेश्वर खु, मयत दिनेश आनंदा पाटील यांचे वारस आशाबाई दिनेश पाटील रा.शिरूड, मयत बापु बाबु भिल यांचे वारस भारती बापु भिल रा. अमळनेर, मयत दत्तात्रय भोजु पाटील यांचे वारस सुनंदा दत्तात्रय पाटील रा.अमळनेर, मयत विलास मोहन चव्हाण यांचे वारस कविता विलास चव्हाण रा.अमळनेर, मयत देवेंद्र पितांबर पाटील यांचे वारस सुनंदा देवेंद्र पाटील रा.अमळनेर, मयत भिकन पाटील यांचे वारस संगिता भिकन पाटील रा.शहापूर, मयत नगराज खंडू पाटील यांचे वारस कल्पना नगराज पाटील रा.जवखेडा, मयत दिलीप मंगल न्हावी यांचे वारस सुनंदा दिलीप न्हावी रा.कळमसरे, मयत अरुण आत्माराम पाटील यांचे वारस सुनिता अरुण पाटील रा.गांधली , मयत अरुण बाबूलाल पवार यांचे वारस ताराबाई अरुण पवार रा.व्यव्हारदळे, मयत रमेश लोटन कोळी (अहिरे) यांचे वारस कल्पनाबाई रमेश कोळी रा.बोहरा, मयत निंबा झावरू भिल यांचे वारस वंदाबाई निंबा भिल रा.दापोरी बु., मयत रफिक जमलोद्दीन शेख यांचे वारस फरीदाबी रफिक शेख रा.अमळनेर, मयत देविदास राजेंद्र भिल यांचे वारस रत्नबाई देविदास भिल रा.खेडी खु.प्र.ज.आदींना धनादेश देण्यात आला.

शासनाकडून ही मदत मिळवून देऊन आधार दिल्याने सर्व लाभार्थ्यांनी आमदार अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले.दरम्यान याआधी देखील अनेक लाभार्थ्यांना या योजनेसह इतर योजनांमधून आर्थिक लाभ मिळाला आहे.

Protected Content