मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फोन टॅपींग प्रकरणात क्लिन चीट मिळाल्यानंतर रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्र पोलिसात मोठे पद प्रदान करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शुक्ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांना क्लिनचिट देण्यात आली आहे. शुक्ला यांच्या विरोधातला तपास आता बंद करण्यात आला आहे.
रश्मी शुक्ला सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्या महासंचालक पदासाठी पात्र ठरत नव्हत्या. मात्र लवकरच त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदी किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे.