मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘हिवाळी शिबीरास सुरुवात झाली. यात ‘चरित्र शुद्ध – ही काळाची गरज’ या विषयावर साक्षी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कोरोनासारख्या भयंकर अशा महामारीनंतर हे सर्वप्रथम शिबिर ज्यात सर्व नियम पाळून शिबिर हे कार्यपूर्तीस येत आहेत शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी जेष्ठ व्याख्याते तथा अनुभववांनी नटलेल्या व्यक्ती आपल्या वाणी तथा विचारांनी सुंदर आकार देण्याचे काम करत आहेत.
शनिवार, दि २६ मार्च रोजी सकाळी राष्ट्रीय सेवा योजनाचे डायरेक्टर नाद्रे सर यांनी मार्गदर्शन केले. डॉ.राजेंद्र राजपूत यांनी ‘सूत्रसंचालन कसे करावे – नियोजन व कृतीबद्दता’ या विषयावर मार्गदर्शन केले. सोबत लेफ्टनंट पाटील यांनी देखील ‘यशस्वी जीवनाचे रहस्य’ सांगितले.
याप्रसंगी स्वयंसेवक यांना सन्मानित करून मंच माजी स्वयंसेवक यांच्याकडे सोपवण्यात आला. माजी स्वयंसेवक कुणाल मानकर यांनी आव्हान शिबिर तसेच विविध शिबिरांबद्दल माहिती सांगून प्रोत्साहित केले. माजी स्वयंसेवक राहुल फुकटे यांनी देखील मार्गदर्शन केले. माजी स्वयंसेविका साक्षी पाटील यांनी ‘नियम कटीबद्दता व शुद्ध चरित्र ही काळाची गरज’ या विषयावर व्यक्त होत “प्रत्येक क्षेत्रात नामवंत व्यक्ती घडण्यासाठी संस्कार, संस्कृती, संकल्पना, गुरू मार्गदर्शन, आई वडील यांचा आदर यातून समाजात वावरत असताना एकता व एकनिष्ठ व्यक्तिमत्व घडवणे म्हणजे एक आदर्श व्यक्ती होय. शुद्ध चरित्राशिवाय माणसाच्या माणुसकीला आकार येत नसतो. म्हणून चांगले व्यक्तिमत्व घडत असताना चरित्राकडे लक्ष देणे हे मात्र तितकंच महत्वाचं आहे,” असे सांगितले
माजी स्वयंसेविका लक्ष्मी बॉंडे यांनी राज्यस्तरीय शिबीराबद्दल माहिती सांगितली. प्रा.अनिल मगर यांनी आपल्या विविध अशा नाट्यशैली अर्थात गाळगेबाबा यांच्या परीवेशातून ग्राम स्वच्छ जागृती रॅली काढली आणि संदेश पर नाट्य सादर केले. स्वयंसेवकांनी देखील अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य तपासणी या सारख्या विषयावर पथनाट्य सादर केले. भारुडाच्या कार्यक्रमाने दिवसाची समाप्ती झाली.
कार्यक्रमाची नियोजन कमिटी राष्ट्रीय सेवा योजना माजी कार्यक्रम अधिकारी डॉ.शरद बिऱ्हाडे,, कार्यक्रम अधिकारी डॉ.सुर्यवंशी, सहाय्यक अधिकारी डॉ.सरला तडवी,सहाय्यक अधिकारी पाडवी सर,यांनी शिबीर यशस्वीसाठी परिश्रम घेतले.