खडसे महाविद्यालयात रासेयोचे शिबीर उत्साहात

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रीमती खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्बोधन शिबिर संपन्न झाले. या उद्बोधन शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे उपस्थित होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एनएसएसचे लक्ष्यगीत सादर करून कार्यक्रमाचा उत्साह वाढवला.

उद्बोधनपर भाषणात प्राध्यापक साळवे यांनी विद्यार्थी हा शिस्तप्रिय असला पाहिजे आणि कुटुंब, समाज आणि राष्ट्रविकासात त्याचा सहभाग असला पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा अंगीकारून विद्यार्थ्यांचा ‘स्वयंसेवक’ बनला पाहिजे असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य महाजन यांनी एन एस एस हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे साधन आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या सुदृढ, बौद्धिक दृष्ट्या गुणवान आणि मानसिक दृष्ट्या कणखर बनले पाहिजे. तसेच एनएसएस चे ब्रीद वाक्य  उराशी बाळगून ‘माझ्यासाठी नव्हे तर दुसऱ्यासाठी’ हे शब्दातून नाही तर आपल्या कृतीतून जगाला संदेश दिला पाहिजे, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली. या  उद्बोधन शिबिराला माजी एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक कोळी यांची विशेष उपस्थिती होती.

या संपूर्ण उद्बोधन शिबिराचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल पाटील, उपप्राचार्य राजेंद्र चौधरी, ग्रंथालयाचे अधीक्षक प्राध्यापक सरोदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.दीपक बावस्कर यांनी केले. हे उद्बोधन शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रणव पवार, शुभम शेळके, नेहा दैवे, प्रतीक्षा चव्हाण, भाग्यश्री भोळे, कोमल दांडगे, कृष्णकांत भारुडकर, कृणाल तायडे, रोशन पाटील, ओम पाटील, हरीओम इंगळे, पवन सुतार, जयेश पाटील, सागर गोरले, नंदन महाजन, यश महाजन,  प्रज्वल भंगाळे, कल्पेश सपकाळे, मयूर कवळे इत्यादी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

फोटोग्राफीचे कार्य चंदन शिमरे यांनी केले. या उद्बोधन शिबिराचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक  एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय डांगे यांनी तर  आभार प्रदर्शन एनएसएस महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताहीरा मीर यांनी केले. या उद्बोधन शिबिराला महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.

 

Protected Content