शिवसेनेला खिंडार ; कल्याणमधील २६ नगरसेवकांचे सामुहिक राजीनामे

Uddhav Thackeray

 

ठाणे प्रतिनिधी । कल्याण पुर्व शिवसेनेच्या तब्बल 26 नगरसेवकांनी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सामूहिक राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले आहेत. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. जागावाटपावरुन ते नाराज असल्यामुळे राजीनामे दिल्याची चर्चा सुरु आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेसह सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सत्ताधारी वर्चस्वासाठी, तर विरोधी पक्ष अस्तित्वासाठी लढत आहेत. सर्वत्र पक्षांतराचे वारे वाहत असतानाच, ठाण्यातील कल्याणमध्ये शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेत तिकीट वाटपावरून मोठी नाराजी पसरली आहे. कल्याण, डोंबिवलीमधील शिवसेनेच्या २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले आहेत. जागावाटपावरून हे नगरसेवक आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने केवळ शिवसेनाच नव्हे तर भाजपसमोरील अडचणी देखील वाढल्या आहेत. कारण महायुतीत काही ठिकाणी शिवसेनेचाही दबदबा आहे. मात्र, यावेळी काही ठिकाणी भाजपने त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. अशावेळी उमेदवाराला स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे.

Protected Content