रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील रसलपूर येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर आज शांतता समितीची बैठक घेण्यात आली. याला डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी मार्गदर्शन केले.
रसलपूर येथे गणपती उत्सव व मोहरम,पोळा सण निमित्त डीवायएसपी पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,psi मनोज वाघमारे,हे को जितू पाटील,करोडपती यांनी मीटिंग घेतली नमूद मीटिंग मध्ये सध्या कोरोना संसर्गजन्य आजार चालू असलेने सर्वांनीं सोशल डिस्टन्स चे पालन करून मास्क चा वापर करावा तसेच गणपती ,मोहरम मिरवणुकीस परवानगी नसून खासगी गणपतीची 2 फुटाची मूर्ती व सार्वजनिक 4 फुटाची मूर्ती बसवावी कोणीही 4 फुटापेक्ध्या मूर्ती बसविणार नाही जे पालन करणार नाही त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व एक गाव एक गणपती बसविण्याचे आवाहन केले व येणारे उत्सव शांततेत पार पडण्याचे आवाहन करण्यात आले.
मिटींगला रसलपूर येथील सुरेश धनके, अनिल चौधरी, सुभाष वानखेडे, अयुब पहेलवान, इस्माईल पहेलवान, कल्लू पहेलवान, हनिफ खान, सरपंच शे सद्दाम, शे शब्बीर, शे सलीम,आरिफ मेम्बर, कैलास पारधी, पोलीस पाटील, परवीन धनके, समाधान सावळे असे हजर होते. दरम्यान शासनाचे परिपत्रकांव्ये मार्गदर्शन करून येणारे उत्सव शांततेत पार पाडणेकरिता सहकार्य करण्याचे आवाहन केले. वेळ 18/15 वा ते 19/15वाजेपर्यंत मीटिंग घेतली आहे. उपस्थित हिंदू मुस्लिम सर्वांनी येणारे उत्सव शांततेत पार पडण्याचे आश्वासन दिले आहे.