चाळीसगावात केली विना मास्क धारकांवर कारवाईसह रॅपिड टेस्ट ! (व्हिडीओ)

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी रात्री ८ वाजेपासून १४ दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभुमीवर चाळीसगाव शहरात नगरपालिका व पोलिस प्रशासनातर्फे सायंकाळी विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करत रॅपिड टेस्ट करण्यात आले.एकूण ६० जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात एक जण हा कोरोना बांधीत आढळून आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू दरात झपाट्याने वाढ होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून चौदा दिवसांसाठी कलम १४४ प्रमाणे संचारबंदी लागू केली आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे. १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू राहणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संचारबंदी लागू असताना विनाकारण कोणीही घरा बाहेर पडू नये म्हणून नगरपालिका व पोलिस प्रशासनातर्फे आज सायंकाळी शहरातील सिग्नल चौकात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यावेळी एकूण २५ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण ५०००-/ हजार रुपयांचे महसूल नगरपालिकेला प्राप्त झाले. दरम्यान कारवाई बरोबर रॅपिड टेस्टही यावेळी करण्यात आले. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून अनोख्या पद्धतीने हे उपक्रम राबविला गेला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे, शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, सहा पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, सहा पोलिस निरीक्षक विशाल टकले, सहा पोलिस निरीक्षक सदगीर, नगरपालिका कर्मचारी निलेश चौधरी, शहर पोलिस व वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1945581995592586

Protected Content