जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून अश्लिल चाळे करत विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी रात्री घडला आहे. याप्रकरणी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात एकावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, पिडीत महिला ही कानळदा रोड परिसरातील एका भागात तिच्या मुलासह वास्तव्याला आहे. महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. महिला ही कल्पेश अशोक अमृतकर याच्याकडे काही महिन्यांपुर्वी पाणीपुरी लाटायला जात असे. मार्च महिन्यानंतर सदर महिलेने काम सोडले. मात्र तरीदेखील अमृतकर हा महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधत होता. महिलेने त्याचा नंबर ब्लॉक केला, मात्र त्याने दुसऱ्या नंबरवरून संपर्क साधत फोन का घेत नाही, असा जाब विचारला. त्यानंतर गुरुवारी १३ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास महिलेच्या घरात घुसून हात पकडला व अंगलट करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अमृतकरची पत्नी घराबाहेर आली व तिने आवाज दिला. मात्र अमृतकर याने सदर महिलेचे तोंड दाबले. महिला कशीतरी बाहेर आहे व अमृतकरच्या पत्नीने पती आहे का असे विचारले असता महिलेने हो सांगत त्याला घराबाहेर हाकलले. ही घटना घडल्यानंतर महिलेने शुक्रवारी १४ जुलै रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी कल्पेश अमृतकर याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.