जळगाव प्रतिनिधी । ”सांगा शेती करू कशी…पोटाची खळगी भरू कशी ?” असा सवाल करत शेतकर्यांच्या व्यथा मांडणारे रॅप साँग सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.
यंदा अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झालेले आहेत. सरकारने अलीकडेच मदत जाहीर केली असली तरी ती पुरेशी नाही. किंबहुना इतक्या मदतीने शेतकरी जगणेदेखील अशक्य असल्याने पुन्हा शेती करण्याचा विचारसुध्दा त्याच्या मनात येऊ शकत नाही. अशा आत्यंतीक वेदनामय कालखंडात बळीराजाच्या व्यथा-वेदना एका रॅप साँगच्या माध्यामातून व्यक्त करण्यात आल्या असून हे गाणे सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. खरं तर हे गाणे काही महिने आधीच युट्युबवर अपलोड करण्यात आले असले तरी सध्याच्या भयंकर स्थितीत ते अधिक समर्पक वाटत असल्याने युजर्स याला मोठ्या प्रमाणात शेअर करत असल्याचे दिसून आले आहे. या रॅप साँगचे गीतकार व संगीतकार अजित शेळके हा अभियांत्रीकीत शिकणारा तरूण आहे. तर चेतन गरूड यांनी याची निर्मिती केली आहे. आपल्यासाठी हे रॅप साँग सादर करत आहोत.
लिंक :