बाबरी पडली तेव्हा मी तेथे होतो, एकही शिवसैनिक नव्हता ! : दानवे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”बाबरी मशिद पडली तेव्हा मी स्वत: तेथे होतो, मात्र एकही शिवसैनिक नव्हता” असे नमूद करत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कालच्या सभेत भाजपला लक्ष्य करत जोरदार टीकास्त्र सोडले. यावरून आता भाजप नेते देखील प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. आधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर टीका केल्यानंतर आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील उध्दव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, . हिंदुत्वाच्या गप्पा सभा घेऊन मारणे आता तुम्ही बंद केले पाहिजे. बाबरी पडली तेव्हा मी सुद्धा तिथे होतो. एकही शिवसैनिक तिथे नव्हता. मुंबई तोडण्याची भाषा झाली तेव्हा बलिदान देण्यामध्ये हेच फक्त होते असे थोडी आहे. अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता. मुंबईला तोडण्याचा कोणाचा हेतू नाही. मुंबई अभेद्य राहणार आहे. मुंबईवर जेव्हा संकटे येतील तेव्हा पक्षभेद विसरुन आम्ही सर्व एकत्र येऊ, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

दानवे पुढे म्हणाले की, राज्यातल्या जनतेला या सभेबद्दल उत्सुकता होती. मुख्यमंत्री राज्याला उद्देषून काही बोलणार म्हणून सर्वजण टिव्हीकडे डोळे लावून बसले होते. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकल्यानंतर सर्वांची निराशा झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून आम्ही काय करतो आहोत, आम्ही काय करणार आहोत आणि राज्याची सध्याची स्थिती काय आहे अशा प्रकारची वक्तव्ये यायला हवी होती. पण विकासाची चर्चा न करता, राज्यातल्या जनतेला कोणताही दिलासा न देता त्यांनी केवळ भाजपावर तोंडसुख घेण्याचे काम केले आहे,

Protected Content