जळगाव, प्रतिनिधी | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा १०० वा प्रयोग उद्या (दि.१८ सप्टेंबर) येथे सादर केला जाणार आहे.
त्यासाठी उद्या दुपारी सावरकरांचे नातू आणि सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, कोषाध्यक्ष सौ. मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर व सदस्य शैलेंद्र चिखलकर हे मान्यवर ‘गीतांजली एक्स्प्रेस’ने मुंबईहून खास शतक महोत्सवी प्रयोगासाठी येत आहेत.