अभिनेत्री अमिषा पटेलविरुद्ध रांची कोर्टाचे अटक वॉरंट

amisha patel

रांची, वृत्तसंस्था | बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलविरुद्ध रांची कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. अमिषा पटेलवर चित्रपट निर्माते अजय कुमार यांचा अडीच कोटींचा चेक बाउंस केल्याचा आरोप आहे. २०१८ साली ‘देसी मॅजिक’ हा चित्रपट बनवण्यासाठी अजय कुमार यांनी अमिषाला तीन कोटी रुपये उसने म्हणून दिले होते. त्यानंतर अमिषाकडे ज्या-ज्या वेळी या पैशांची मागणी केली त्या-त्या वेळी तिने पैसे देण्याऐवजी काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली, असा आरोप अजय कुमार यांनी केला आहे. अमिषा पटेल पैसे परत देत नसल्याने अजय कुमार यांनी कोर्टात धाव घेतली होती.

 

‘देसी मॅजिक’ हा चित्रपट पूर्ण होऊ न शकल्याने निर्मात्याने अमिषाकडे पैशांची मागणी केली. अमिषाने मोठ्या मुश्किलीने अडीच कोटींचा चेक दिला. परंतु, ज्यावेळी हा चेक बँकेत जमा केला तर तो बाउंस झाला. या चेक बाउंसप्रकरणी अमिषाविरुद्ध रांची कोर्टात पैशांची फसवणूक केल्याचा खटला सुरू आहे. फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत अमिषा हिला अनेकवेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने एकदाही याला उत्तर दिले नाही. त्यानंतर कोर्टाने तिला अनेकवेळा समन्स पाठवले. पैशांवरून कोर्टात अनेकदा कारवाई करण्यात आली. तीन कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेली अमिषा पटेल ही अभिनेता हृतिक रोशन पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’.. या चित्रपटाच्या यशानंतर चर्चेत आली होती. ती त्या काळी सर्वात नावाजलेली असलेली अभिनेत्री होती. प्रसिद्ध लोकांचे फोटो दाखवून अमिषा पटेल हिने धमकी दिल्याचा आरोपही अजय कुमार यांनी केला आहे. अमिषा पटेल विरोधात या आधीही फसवणूक केल्याचे आरोप झाले आहेत.

अमिषा पटेल विरोधात ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला होता. एका लग्नसमारंभात येऊन डान्स करण्यासाठी तिला ११ लाख रुपये देण्यात आले होते. परंतु, पैसे घेऊनही अमिषा लग्न समारंभात पोहोचली नाही. तसेच तिनं जे डान्स करण्याचे आश्वासन दिले होते ते पाळले नाही, असा तिच्यावर आरोप आहे. अमिषाने ही रक्कम आरोपी राजकुमार न्यू मॅक्स इंटरटेनमेंट कंपनीच्या नावावर घेतली होती. अमिषावर हा आरोप मुरादाबादमधील ड्रीम विजन इवेंट मॅनेजमेंट कंपनी चालवणाऱ्या पवन वर्मा यांनी केला होता.

Protected Content