मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असणारे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाला आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केल्यानंतर झालेल्या घडामोडींमध्ये राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा जामीन आधी फेटाळण्यात आला होता. यानंतर त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी होऊन आज निकाल लागला असून यात रवी राणा आणि नवनीत राणा यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.
दरम्यान, आज सकाळीच नवनीत राणा यांना पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास सुरू झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून यामुळे या दाम्पत्याला मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.