शबरीधामच्या भेटीत ‘भक्तीगंध’ ने जाणले रामायण

8df624b1 25e7 4d22 b2b0 8025d18ff01d

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील भक्तीगंध मंडळाच्या वतीने शहरात तालुक्यात अनेकविध ठिकाणी भजनसंध्या,धार्मिक,पौराणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. सामाजिक व धार्मिक एकोपा निर्माण करण्यासाठी सण,उत्सव,गणेशोत्सव तसेच  नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून भक्तीभावाने आणि श्रध्देने भजन संध्या कार्यक्रमातून भावगीते,जोगवा,गवळण आणि भक्तीगीते सादर केली जात असतात. यावेळी गायन शिक्षक श्रीनिवास मोडक यांच्या संकल्पनेतून शबरीधाम येथे महिला सदस्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते,यात शबरीधाम,पाम्पा सरोवर आणि दंडकारण्यास भेट देण्यात आली.

 

दिनांक १२ मार्च रोजी गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात असलेल्या शबरी धाम येथे सहलीचे आयोजन करण्यात आलेले होते.डांग जिल्ह्यातील सुबीर गावाजवळ असलेल्या शबरीधाम येथील अनेकविध ठिकाणी भेट देण्यात आली.या ठिकाणी शबरी आणि प्रभुरामचंद्र यांची भेट झाली होती.अनेक धार्मिक ग्रंथात शबरी कथा,रामायण,भागवत,रामचरितमानस व साकेत इत्यादी आढळते.यात शबरीच्या भक्तीची निष्ठा व्यक्त केलेली आढळून येते.हे शबरी धाम आता धार्मिक पर्यटन स्थळांत रुपांतरीत झाले असून अनेक भाविक पर्यटकांची रीघ मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

 

येथून जवळच पाम्पा तलाव म्हणून सरोवर प्रसिद्ध आहे.हिंदू धर्मशास्त्रानुसार पाच पवित्र झरे असून ज्याला सामूहिकपणे पंच-सरोवर म्हटले जाते त्यापैकी मानसरोवर,बिंदू सरोवर,नारायण सरोवर,पुष्कर सरोवर आणि एक म्हणजे शबरीधाम येथील पाम्पा सरोवराचा उल्लेख भागवत पुराणातही आढळून येतो.हिंदू पुराणांनुसार भगवान शिव यांच्या तपस्या दर्शविण्यासाठी पाम्पा सरोवरास अग्रणी स्थान म्हणून संबोधले आहे.हिंदू महाकाय म्हणून केलेला उल्लेख रामायणमध्ये असल्याचे दाखले अनेक धार्मिक ग्रंथात पहावयास मिळतात

याच ठिकाणी काही अंतरावर दंडकारण्याचे घनदाट जंगल असून हे अभयारण्य पाम्पा सरोवरच्या पवित्र किनाऱ्यावर वसलेले आहे.या ठिकाणी मातंग ऋषि त्यांच्या शिष्यांसह राहत असत आणि एकाग्र आणि शांत मंत्रांमध्ये तपस्या करण्याचे प्रयुक्त होते.अतुलनीय साधना आणि मातंग ऋषीची ताकद व सत्त्विकता आणि श्रीरामांचे भक्ती अत्यंत प्रभावित होती.पूर्वी श्रीराम,सीता व लक्ष्मण यांच्यासह चौदा वर्षे निर्वासित होण्याकरीता जंगलात आल्याचा उल्लेख आणि आख्यायिका नमूद झालेल्या दिसून येतात. सरोज जाधव,शोभा कोतकर,नलिनी जाधव,जयश्री निंबाळकर,विद्या पाटील,केतकी घांगुर्डे,सुरेखा कोठावदे,सरोज देशपांडे,अनुराधा साळुंखे,राजश्री शुक्ल,प्रमिला भामरे,वंदना साठे,माया जोशी,हिराबाई साळुंके,स्मिता पवार,सुवर्णा देवकर,शुभांगी संन्यासी महिलांनी सहलीचा आनंद घेतला.

Add Comment

Protected Content