जळगाव प्रतिनिधी । शहरातील समतानगरसह पिंप्राळा हुडकोत गावठी दारुसह सट्टा खेळणार्यांवर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गावठी दारुची विक्री करणार्या विश्वास अरुण गारूंगे वय ४१ रा. समतानगर, सुमनबाई सोना अहिरे रा. सिध्दार्थ नगर पिंप्राळा हुडको दोघांसह सट्टा खेळणार्या गुलाब वामन गायकवाड वय ४२ रा. मातंगवाडा, पिंप्राळा हुडको या तिघांविरोधात पोलिसांनी फिर्यादी होवून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
समतानगर येथे विश्वास अरुण गारुंगे हा गावठी दारुची विक्री करत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परेदशी, सहाय्यक फौजदार गोपाळ चौधरी, पोलीस नाईक शिवाजी धुमाळ यांच्या पथकाने कारवाई करुन २० लीटर १ हजार ५० रुपयांची गावठी दारु जप्त केली व संशयित विश्वास अरुण गारुंगे यास ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात कर्मचारी सुशील अरुण चौधरी याच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर पथकाने पिंप्राळा हुडका येथील सिध्दार्थ नगरमध्ये गावठी दारु विकी करणार्या सुमनबाई सोना अहिरे हिच्यावर कारवाई केली. या कारवाईत पथकाने १८ लीटर ९०० रुपयांची गावठी दारु जप्त केली आहे. याप्रकरणी सुमनबाई अहिरे यांच्या विरोधात पोलीस नाईक रविंद्र गोरख पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा हुडकोतील मातंगवाडा येथे कल्याण मटका नावाचा सट्ट्याचा खेळ खेळणार्या गुलाब वामन गायकवाड वय ४२ याच्यावर कावाई करण्यात येवून ३०० रुपये रोख व सट्टा जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कर्मचारी रविंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.