जळगाव प्रतिनिधी । रामानंद नगर पोलीस दाखल असलेला हद्दपार गुन्हेगारास पोलीसांनी अटक करण्यात यश आले आहे. दिपक उर्फ मीरिंडा राजाराम चौधरी रा. समता नगर असे आरोपीचे नाव आहे.
रामानंद नगर पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी दिपक चौधरी याला एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आला होता. आज 27 ऑगस्ट रोजी रामानंद नगर परीसरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पथक रवाना केले. या पथकात स.फौ. गोपाल चौधरी, पो.ना.प्रदिप चौधरी, पो.ना. विजय खैरे, पो.कॉ. संतोष गिते यांनी कारवाई करत आरोपी दिपक चौधरी याला गिरणा टाकीजवळ उभा असतांना ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास स.फौ. गोपाल चौधरी करीत आहे.