सावदा, ता.रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील पुरातन श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा दि १० रोजी उत्साहात संपन्न झाला तर आज दिनांक ११ रोजी परंपरेप्रमाणे मंदिरातील मूर्तीची पालखी मिरवणूक तसेच मान मानलेल्या लहान बाळाची सहिभाला मिरवणूक संध्याकाळी उत्साहात पार पडली.
दरसाल प्रमाणे यंदाही येथील श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात श्रीराम जन्मोत्सव सोहळा गावकरी , भाविकांच्या उपस्थितीत पार पडला सदर वेळी आरती प्रसाद व राम भजनाच्या निनादात भाविकांनी दर्शन घेतले चिनावल करांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती
दरम्यान रामनवमी दिवशीच गाव जत्रा असते तसेच कर्ण छेदन असणाऱ्या बालकांना वाजत गाजत मंदीरात दर्शनासाठी आणले जाते या मुळे गावात व मंदिरात अध्यात्मिक वातावरण असते यंदा युवा वर्गानेहि रामजन्मउत्सव उत्साहात व जागरण करून साजरा केला
या मंदीराची अख्यायिका अशी आहे की, ‘येथे भाविक मूलबाळ होण्यासाठी कामना करतात. येथे मान मानून इच्छापूर्ती झाल्यास या बालकांचा मान देण्यासाठी रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी मुलांचे आप्तगण ह्या लहान बालकांना सजवलेल्या बैलगाडीवर श्रीकृष्ण रुप देवून मंदिरात प्रथम दर्शनासाठी आणतात व गावातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढतात. यास ‘सहिभाला’ असे संबोधतात.
या सहिभाला मिरवणूकमागे वर्षानुवर्षे चालत आलेली परंपराप्रमाणे मंदिरातील श्रीराम मूर्तीची सजवलेल्या गाडीतून मंगल वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात येते. यावेळी गावात मोठा उत्सव असतो यंदाही हा उत्सव आज दिनांक ११ रोजी सायंकाळी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली गेल्या २ वर्षापासून कोरोनामुळे उत्सव छोट्या प्रमाणात केला होता. मात्र यंदा प्रशासनाकडून येथील श्रीराम मंदिर संस्थानला परवानगी मिळाल्याने साजरा करण्यात आला.
मंदिर संस्थान व गावकरी, तरुण यांच्या सहकार्याने हा उत्सव यंदा शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि ९ रोजी झालेल्या एका संयुक्त बैठकीत फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कृणाल सोनवणे, सावदा पो.स्टे.चे सपोनी देविदास इंगोले, पो.उप.निरिक्षक समाधान गायकवाड यांनी केले होते. तो उत्सव यंदा शांततेत पार पडला.
गावातील प्रमुख मार्गावरून श्री राम पालखी व सहिभाले मिरवणूकने गावात अध्यात्मिक व उत्साहाचे वातावरण होते. यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड हे.कॉ.देवेंद्र पाटील, संजीव चौधरी, विनोद पाटील, मजहर तडवी व जळगाव दंगा नियंत्रण पथक बंदोबस्तसाठी उपस्थित होते. तर मंदिर संस्थानचे पोलीस पाटील निलेश नेमाडे, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले व गावातील गावकरी, पदाधिकारी उपस्थित होते.