गोदावरी संगीत महाविद्यालयात रामभक्ती गीत कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे आगमन व प्राणप्रतिष्ठापणेच्या पूर्वसंध्येला गोदावरी संगीत महाविद्यालया तर्फे राम भक्ती गीतांचा भक्तिमय कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सौ वर्षा पाटील यांनी दीप प्रज्वलन करून केली. यावेळेस प्राचार्य सौ पद्मजा नेवे, डॉ. महिमा मिश्रा, श्री भूषण गुरव, श्री सुशील महाजन, श्री देवेंद्र गुरव आदी प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवातीस आज अयोध्या सजली या गीताने करण्यात आली हे गीत नाजनीन शेख, निकिता जोशी , साक्षी पाटील, चेतना पाटकरी, खुशी पांडे, इशा चिंचाळे यांनी सादर केले तर याच गीतावर सुरेल असे नृत्य रिया वर्मा, खुशिता कोल्हे, समृद्धी जोशी यांनी सादर केले. यानंतर ऋतुराज जोशी यांनी ‌स्वये श्री राम प्रभू ऐकती हे गीत सादर केले तर सुख के सब साथी हे गीत निकिता जोशी यांनी तर श्रीराम चंद्र कृपाळू भज मन हे गीत प्राचार्य सौ पद्मजा नेवे व नाजनीन शेख यांनी सादर केले असे एकाहून एक अनेक भक्तिगीते विद्यार्थ्यांनी सादर केली तर कार्यक्रमाची सांगता मेरे घर राम आये है या गीताने करण्यात आली कार्यक्रमासाठी साथ संगत श्री प्रवीण महाजन तबला, सौ पद्मजा नेवे व स्वरांजली पाटील हार्मोनियम यांनी केली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रव्यवस्थापक श्री राजू पाटील, श्री अनंता साठे, श्री किशोर चौधरी यांचे सहकार्य लाभले

Protected Content