बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणार्या तालुक्यातील शिरसाळे येथील श्री हनुमान मंदिरात सुरू असलेल्या श्रीराम कथा कार्यक्रमात उपस्थित राहून खा. रक्षाताई खडसे यांनी आशीर्वाद घेतले.
बरादवड तालुक्यातील श्रीक्षेत्र शिरसाळे येथील श्री हनुमान मंदिर ट्रस्ट मार्फत श्री हनुमान याग (पंचकुंडी यज्ञ) निमित्त प.पु.सतपंथरत्न १००८ महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून श्री राम कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आमदार संजय सावकारे यांच्यासह उपस्थित राहून कथेचे श्रवण केले.
याप्रसंगी खा. रक्षाताई खडसे यांनी आरती करून दर्शन घेतले. यानंतर त्यांनी उपस्थित भक्तांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित भक्तांसाठी मनोज बियाणी यांच्या परिवार मार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.