यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यावलचे नुकतीच दोन दिवसापूर्वी निवड झालेले सभापती राकेश फेगडे यांनी नागरीकांच्या व व्यापारी बांधवांच्या परिसर स्वच्छेते संदर्भात प्राधाऱ्य देत तात्काळ कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर स्वच्छता मोहीम राबवली.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रतिदिन अनेक केळी व्यापारी यांच्या शेतकऱ्यांची खरेदी केलेल्या केळी व ईतर मालवाहू वाहनांची वर्दळ असते,यावेळी केळी वाहतुक करणारी वाहन या ठिकाणी वाहतूकीसाठी जाणाऱ्या केळींची वाहनात रचना केली जाते. यात केळी वाहतुक करणाऱ्या वाहनातून विघालेली केळीपत्ती ही व्यापारी व केळी वाहतुक करणारी मंडळी आवारातच ती केळीची पत्ती फेकुन देत असल्याने परिसरात मोठया प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्याने नुतन सभापती राकेश फेगडे यांनी पदभार स्विकारताच त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व कर्मचारी बांधवांची बैठक घेत त्यांना आवश्यक त्या सुचना देत त्यांच्या अडीअडचणी समजुन घेत त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे परिसर हे विशेष करून स्वच्छ राखण्या संदर्भातील सुचना देत मार्गदर्शन केली. येणाऱ्या काळात आपण अनेक शेतकरी बांधवांच्या व व्यापारी यांच्याशी निगडीत हिताचे समतोल असे निर्णय घेणार असल्याचे देखील सभापती राकेश वसंत फेगडे यांनी यावेळी सांगीतले .