यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश वसंत फेगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात १८ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी १ वाजता सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एस एफ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवउ करण्यात आली.
सर्वसाधारण सभेत कोरपावली तालुका यावल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा भाजपाच्या सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश वसंत फेगडे यांची सर्वानुमते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी मावळते सभापती हर्षल गोविंदा पाटील, उपसभापती दगडू जनार्दन कोळी, माजी सभापती नारायण शशीकांत चौधरी, उमेश प्रभाकर पाटील, सागर राजेन्द्र महाजन, पंकज दिनकर चौधरी, संजय चुडामण पाटील, कांचन ताराचंद फालक, राखी योगराज बऱ्हाटे, यशवंत माधव तळेले, विलास चंद्रभान पाटील, दिपक नरोत्तम चौधरी, अशोक त्र्यंबक चौधरी, उज्जैनसिंग भाऊलाल राजपूत, सुर्यभान निंबा पाटील, सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, सुनिल वासुदेव बारी हे संचालक या सर्वसाधारण सभेस उपस्थित होते.
यावेळी निवड झालेले नुतन सभापती राकेश फेगडे यांचे भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रविन्द्र उर्फ छोटू पाटील, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी, भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिपक पाटील यांच्यासह महायुतीचे कार्यकर्त व पदाधिकारी आदीनी त्यांचे स्वागत केले .