मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिलिंद देवरा यांना संधी दिली आहे. काही दिवसांपुर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांनी राज्यसभेवर पाठविलेल्या सहा जणांची मुदत २ एप्रिलला संपणार आहे.
यासाठी मार्च महिन्यात निवडणूक होणार आहे. यात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन (सर्व भाजप), खासदार अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार गट) व कुमार केतकर (काँग्रेस) यांचा समावेश आहे. भाजपकडून देखील तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) कडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.