यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील राजोरे येथे भुसावळातील भोळे महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन माजी सैनिक मुरलीधर कोळी यांच्याहस्ते बुधवार ९ मार्च रोजी सकाळी करण्यात आले.
याप्रसंगी राजोरे तालुका यावल येथील सरपंच पुष्पा पाटील यांच्याहस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. उद्घाटन समारंभाला अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी. फालक तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच दिनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा महाजन आणि रोहिणी बोरोले शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना सोनवणे उपशिक्षिका संध्या सोनवणे उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात माजी सैनिक मुरलीधर कोळी यांनी जीवनात शिस्त पालन करीत प्रगतीचा ध्यास ठेवला तर विकास निश्चित होईल, असे आवाहन केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.आर. पी फालक यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात मिळालेल्या अनुभवांचा जीवनात कसा फायदा होतो ते विविध माजी विद्यार्थ्यांची उदाहरणे देवून स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जी. पी. वाघुळदे आणि महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. निर्मला वानखेडे यांनी केले. सूत्रसंचालन माजी स्वयंसेवक मयूर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन शिबिरासाठी विद्यार्थिनी मीनाक्षी आमोदकर हिने मानले.