धरणगाव प्रतिनिधी । येथील नगर परिषदतर्फे आज माँ साहेब राजमाता जिजाऊ भोसले, व भारतीय तत्वज्ञानाचा जगभरात प्रसार करणारे, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळ माजी नगराध्यक्षा उषा वाघ, अंजली विसावे, पुष्पा महाजन यांनी माँ साहेब राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नगर परिषदतर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटिल, नगरसेविका किर्ती मराठे, संगिता मराठे, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, नंदकिशोर पाटील, जितेंद्र धनगर, गुलाब मराठे, महेंद्र चौधरी, राहुल रोकडे, अरविंद चौधरी, जयेश महाजन, अरुणा पाटील, नीना पाटील, ज्योती पाटील, दिपाली पाटील, माधुरी पाटील, रत्ना धनगर, वैशाली पवार, प्रिती भाटीया, नगर परिषदेचे ओ.एस. संजय मिसर, जयेश भावसार, अनिल पाटील, बांधकाम पि.एस.चौधरी, नगरसेवक व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह नगरसेवक व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, जिजाऊमाता ब्रिगेड कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लक्ष्मण पाटील यांनी केले.