जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील आमखेडा देवी येथे सरपंच परिषद जामनेर तालुका बैठक नुकतीच घेण्यात आली असून तालुकाध्यक्ष पदी राजमल पाटील तर माहिला तालुकाध्यक्षपदी लिलाबाई चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी दत्ताभाऊ काकडे अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई यांचे नेतृत्वाखालील पुरुष व महिला तालुका कार्यकारिणीची जिल्हा सन्मवयक युवराज पाटील व बाळू धुमाळ, तालुका सन्मवयक श्रिकांत पाटील, बाळू चव्हाण यांचे मार्गदशनाखाली निवड करण्यात आली.
यामध्ये सरपंच परिषद जामनेर तालुका अध्यक्ष -राजमाल भागवत, लोंढरी उपाध्यक्ष -भगवान पाटील, माळपिप्री उपाध्यक्ष- किशोर नाईक, खडकी कार्याध्यक्ष-बाळू धुमाळ,मेणगाव कोषाध्यक्ष-बाळू चवरे, टाकळी खु|| सचिव-युवराज पाटील, आमखेडा देवी सहसचिव-रवी हडप ,मिराचे पळासखेडा संघटक -अमोल पाटील,केकतनिभोरा सहसंघटक-मनोज पाटील,सवतखेडा प्रसिध्दप्रमुख-सुभाष पाटील,कासली सदस्य माधव महाजन,गारखेडा खु|| भागवत पाटील, भराडी नवल चव्हाण रामपूर, हर्षल चौधरी, नाचनखेडा युवराज पाटील ,तोरणाळा ज्ञानेश्वर पाटील ,तोंडापुर विजय पाटील, निमखेडी रघुनाथ पाटील, सोनाळा समशोद्दीन तडवी, चिलगाव याप्रमाणे पुरुष कार्यकारिणी जाहीर झाली असून त्याच बरोबर महिला कार्यकारिणी पुढीलप्रमाणे सरपंच परिषद तालुका जामनेर तालुकाध्यक्ष – लिलाबाई चव्हाण, अंबिलहोळ उपाध्यक्ष-संगीता गायकवाड ,वाकडी ।उपाध्यक्ष-मीना रंदाळ, शेंगोळा कार्याध्यक्ष श्रावण पाटील, एकुलती सचिव- निता पाटील, पहूर पेठ कोषाध्यक्ष-बद्रीबाई चव्हाण ,कापुसवाडी संपर्कप्रमुख-भावना पाटील किनी प्रसिद्धीप्रमुख-मनीषा पाटील ,लहासर सदस्य पूजा पाटील, वाकीबुद्रुक शारदा पाटील, नांद्रा प्रल सीमा पाटील, दोडवडा शारदा चौधरी, हिंगणे बुद्रुक वैशाली पाटील, सुनसगाव रंजनाबाई राठोड, मोराड, कविता राजपूत जंगिपुरा भाविनी पाटील, मोहाडी सदस्य-चित्रा राजपूत, गोंडखेड तालुका समन्वयक-श्रीकांत दयाराम पाटील ,सामरोद याप्रमाणे जामनेर तालुक्यातील सरपंच परिषद कार्यकारिणी घोषित करण्यात आले असून सर्व नवीन पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या सरपंच परिषद बैठकीला जामनेर तालुक्यातील सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.