याबाबत वृत्त असे की, राज्यात सर्वत्र पाण्याने हाहाकार माजवला असून पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे यात नागरिकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यात वित्तहानी,जीवित हानी झाल्याने अनेक नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यात राज्यातुन अनेकविध ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू असताना एक हात मदतीचा या अंतर्गत पुरबाधित बांधवांना सढळ हाताने मदत व्हावी या हेतूने शहरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चाळीसगाव तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यात अनेक सामाजिक सेवा संस्था यासह राजकीय पदाधिकार्यांनी स्वेच्छेने मदतीचा हात पुढे करीत साधन सामुग्री सुपूर्द केली
आपण समाजाचे काही देणे लागतो ही उदात्त भावना लक्षात घेत पूरग्रस्त बांधवांना जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आल्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी सांगितले. त्यांच्या आवाहनाला तालुक्यातून प्रतिसाद लाभला आहे. नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी तालुक्यातुन जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी सर्व संघटनाना आवाहन केले. सर्व पक्ष संघटनांना सोबत घेत राजीवदादा देशमुख यांनी हातात घेतलेली मोहीम कौतुकास्पद असल्याचे जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी सांगितले तर डॉ.सुनील राजपूत यांनी जास्तीत जास्त औषधींचा साठा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे यांनी पुरबधित बांधवांना गरजेच्या वस्तू देण्याचे आवाहन यावेळी केले. मदत करण्यास इच्छुक असणार्या तालुक्यातील नागरिकांनी राजपूत मंगल कार्यालयात सुरू असलेल्या मदत केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.