‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये दिसले पंतप्रधानांचे वेगळे रूप

man vs wild

नवी दिल्ली वृत्तसंस्था । डिस्कव्हरी वाहिनीवरील जगप्रसिध्द ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेअर ग्रील्ससोबत सहभागी झाले असून यातून त्यांच्या आयुष्याचा वेगळा पैलू दिसून आला आहे.

काही दिवसांपूर्वीच बेअर ग्रील्स याने आपल्या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार असल्याचे जाहीर केल्याने याबाबत उत्सुकता लागली होती. सोमवारी रात्री हा एपिसोड प्रसारीत करण्यात आला. यात ग्रिल्स यांनी मोदींच्या त्यांच्या आयुष्यातील घटनांची माहिती विचारली. तेव्हा ते म्हणाले, गेल्या १८ वर्षांतील ही माझी पहिली सुटी आहे. माझ्या लहानपणी घरी गरिबी होती. परंतु वडील पोस्टकार्ड घेऊन येत आणि नातेवाइकांना पावसाची माहिती कळवत असत. पावसाची आनंदवार्ता देऊन त्यांना किती समाधान मिळत असेल, हे आता आम्हाला कळले. ग्रिल्स यांनी विचारले, तुम्ही कधी निराश होता का? तेव्हा ते म्हणाले, नैराश्य कसे येते? याची मला कल्पना नाही. मी प्रत्येक गोष्टीत आशा बाळगतो. तरुणांना सांगू इच्छितो, आपण आयुष्य तुकड्यात समजून घेऊ नये. आयुष्याकडे पूर्णत्वाने पाहावे. पुढील ध्येय गाठता येतील.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आम्ही लहान असतांना परिस्थितीमुळे कपडे धुण्यासाठी मला कधी डिटर्जन्टही मिळाला नाही. मग आम्ही पानांवर दवबिंदूंसह जमा होणारे मीठ गोळा करून त्याने कपडे स्वच्छ करायचो. कोळसे एका भांड्यात घालून त्या भांड्याने कपड्यांना इस्त्री करायचो.

Protected Content