सत्रासेन येथे ग्राम पंचायत लघुपटाचे चित्रीकरण

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वर्डी येथील रघुपती फिल्म्स निर्मित ग्राम पंचायत या स्वच्छ भारत अभियानावर आधारित लघुपटाचे सत्रासेन येथे चित्रीकरण करण्यात आले.

निर्माता गौरव नाथ यांनी ग्रामीण भागातील अभिनय क्षेत्राचा कोणताही गंध नसणार्‍या युवक युवतींना घेऊन चित्रपट निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला. या लघुपटात भूमिका करणारे बरेच युवक हे तळागाळातील आहेत. कोणत्याही प्रकारे अभिनयाचे प्रशिक्षण नसतांनाही गौरव नाथ यांनी अथक परिश्रमाने युवकांना संघटीत करून त्यांच्यातील कलागुणांना हेरून नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा दिली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नामांकन प्राप्त झारखंड येथील नेतरहाट फिल्म इन्स्टिट्यूटचे अमीत सम्राट यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन तर विनीत चौधरी यांनी सहदिग्दर्शन केले आहे. प्रमुख भूमिकेत नाशिक येथील मराठी अभिनेत्री पूजा वाघ व वर्डी येथील मोहन चव्हाण, दीपेश राठोड व अतुल लोहार हे आहेत. तर सहअभिनेता म्हणून चोपडा परिसरातील अधिकार सोनवणे, किरण सोनवणे, श्‍वेतांबरी अहिरे, रोहित पाटील,विशाल धनगर, विजय पाथरे, सागर पाटील, गोपाल क्षीरसागर व सौरव नायदे यांच्या भूमिका आहेत. शूटिंगचे मुख्य व्यवस्थापक सत्रासेनचे सरपंच ज्ञानेश्‍वर भादले, हे होते. तसेच धनराज साळुंखे, सत्रासेन येथील ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थी विद्यार्थिनींनी भुपेश डाभे, फिरोज रिक्षावाला, शरद धनगर, नितीन धनगर, देवेंद्र पाटील, दीपक पाटील, हिरालाल पाटील, संदीप धनगर, विवेक गुजर व सागर पाटील यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, सत्रासेन या ठिकाणी चित्रीकरण होत असताना गावातील आबालवृद्धांनी शूटिंग कसे चालते याचा अनुभव घेतला. शूटिंगसाठी आलेल्या सर्व टीमने विश्‍व आदिवासी दिवस व क्रांती दिनाचे औचित्य साधत सत्रासेन गावाची ग्राम-स्वच्छताही केली. त्यामुळे गावकर्‍यांनी त्यांचे कौतुक केले.

Protected Content