जागतिक पर्यावरणदिनी तापी परीसरातील ग्रामस्थांना रोपांचे वाटप

चोपडा प्रतिनिधी। नेहरू युवा केंद्र, तापी फाऊंडेशन व तालुक्यातील तांदलवाडी येथील सत्यवद फाऊंडेशनच्या वतीने आज जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमेचे औचित्य साधून तापी परिसरातील निमगव्हाण, तांदलवाडी व दोंदवाडे या गावात ग्रामस्थांसह महिलांना वडाच्या रोपट्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

तालुक्यातील तांदलवाडी सरपंच सुनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन कोळी (दोंदवाडे) उपस्थित होते. वितरित होणाऱ्‍या प्रत्येक रोपट्याचे भविष्यात वृक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी घेणाऱ्‍या व्यक्ती व कुटुंबालाच यावेळी रोप देण्यात आले. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांचे मार्गदर्शन लाभले. अशा प्रकारचा चोपडा तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे बोलले जात आहे.

यांची होती उपस्थिती
उपक्रम यशस्वीतेसाठी तापी फाऊंडेशनचे अनिल शिवाजी बाविस्कर, प्रा.यशवंत पाटील, लिलाधर बाविस्कर, विशाल पाटील, अरूण पाटील, गोपाल पाटील, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक निलेश बाविस्कर, संदिप इंगळे, सूकदेव कोळी, युवराज पाटिल, ज्ञानेश्वर कोळी, ललित चव्हाण यांच्यासह श्री.दादा सेवा समिती व ग्रामविकास समितीने परीश्रम घेतले. दरम्यान, परिसरातील नागरिकांना पिंपळ किंवा कडुनिंबाची रोपे हवे असतील, त्यांनी ८८८८०४६९५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content