Home Cities भुसावळ अरे व्वा : राजधानी एक्सप्रेसला भुसावळ स्थानकावर थांबा-रक्षाताई खडसेंचे प्रयत्न

अरे व्वा : राजधानी एक्सप्रेसला भुसावळ स्थानकावर थांबा-रक्षाताई खडसेंचे प्रयत्न

0
127

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेसला आता भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला असून यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांचा पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.

भुसावळ रेल्वे स्थानकावरून जाऊन देखील येथे न थांबणारी अतिवेगवान ट्रेन म्हणून राजधानीची ख्याती होती. अर्थात खूप मोठे स्थानक असतांनाही राजधानीला थांबा नसल्याने भुसावळ परिसरातील जनतेची मोठी कुचंबणा होत होती. याची दखल घेऊन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी पाठपुरावा करून राजधानीला भुसावळ येथे थांबा मिळवला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतो पत्र रक्षाताई खडसे यांना पाठविले आहे.

दरम्यान, यासोबत रक्षाताईंच्या पाठपुराव्यानेच मलकापूर रेल्वे स्थानकावर अमरावती ए_क्सप्रेसला, गरीबरथ एक्सप्रेसला आदी रेल्वे गाड्यांना देखील थांबा मिळाला आहे. यामुळे त्या परिसरातील प्रवाशांना लाभ होणार आहे.


Protected Content

Play sound