यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोल्हापूर येथे राजर्षी शाहू स्मारकात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच कार्यक्रम पार पडला. यामध्ये यावल तालुक्यातील ज्योती मोटे-जाधव (काळाडोह), अर्चना कोल्हे (चितोडे), आरिफ तडवी (जामूनझिरा) व फारुकी सर(वड्री उर्दू) या चार शिक्षकांना राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इस्रोचे अभियंता नगिनभाई प्रजापती हे होते.या पुरस्काराचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार साहेब यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली.सदरहू कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमास यावलचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके व गट समन्वयक महंमद तडवी यांनी उपस्थिती दाखवून पुरस्कारार्थी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली हे विशेष !.
यावलचे प्रमुख अधिकारी व आदर्श शिक्षक पुरस्कारास कोल्हापूर येथे उपस्थित राहिल्याने त्यांनी जळगाव जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.तर तालुक्यातील ज्योती मोटे-जाधव (काळाडोह),अर्चना कोल्हे(चितोडे),आरिफ तडवी (जामूनझिरा) व फारुकी (वड्री उर्दू) या चार शिक्षकांना राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.