राज ठाकरे-शरद पवारांमध्ये चर्चा; मनसे लोकसभा लढवण्यास अनुत्सुक

0Sharad 26 Raj 4

मुंबई (प्रतिनिधी) मनसे लोकसभा लढवण्यास अनुत्सुक असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान,या संदर्भात राज ठाकरेंची शरद पवारांबरोबर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून लोकसभा निवडणूक लढण्यास मनसे इच्छुक नसल्याचे म्हटले जात आहे.

राज ठाकरेंचा मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत समाविष्ट होणार का?, याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. परंतु मनसेला केवळ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढवण्यात रस आहे. लोकसभा निवडणूक लढण्यास मनसे इच्छुक नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र लोकसभेच्या रिंगणात उतरले नाही, तरी सरकारला पाडण्यासाठी मनसे मदत करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Add Comment

Protected Content