मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज गुढीपाडवा मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करतांना महायुतीला विनाशर्त पाठींबा जाहीर केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू होती. विशेष करून राज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर याबाबतचे अंदाज व्यक्त करण्यात येत होते.
दरम्यान, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य दसरा मेळावा आयोजीत करण्यात आला असून यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून उध्दव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. त्यांनी भाजप सरकारने केलेल्या चांगल्या कामांचा उल्लेख करतांना आपणच सर्वप्रथम मोदींनी पंतप्रधान व्हावे ही अपेक्षा व्यक्त केल्याकडेही लक्ष वेधून घेतले. यानंतर त्यांनी आपण महायुतीला विनाशर्त पाठींबा देत असल्याची घोषणा केली.