मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच पक्षांमधील हालचाली वाढल्या आहेत. जागावाटप आणि उमेदवारी यादी जाहीर करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. त्यात मनसेनेही या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौ-यासह निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यात शिवतीर्थ निवासस्थानी मनसे नेत्यांच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. मनसे नेते अमित ठाकरे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समोर आले आहे. माहिम मतदारसंघातून ते लढतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अमित ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढावी अशी मनसे नेत्यांनी राज ठाकरेंकडे आग्रह धरला आहे. त्यात अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून भांडुप आणि माहिम मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. या दोन्ही मतदारसंघात मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे. माहिममध्ये २००९ मध्ये मनसे आमदार निवडून आले होते.