Home राजकीय मोदींनी घाणेरडे राजकारण केले- राज ठाकरे

मोदींनी घाणेरडे राजकारण केले- राज ठाकरे

0
31

मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतांसाठी घाणेरडे राजकारण केले असल्याचा आरोप करत मसने प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते मनसेच्या पाडवा मेळाव्यात बोलत होते.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रखर भाजपविरोधी भूमिका घेतली असल्यामुळे ते शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या पाडवा मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आणि अपेक्षेनुसार राज यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, मोदींना जवानांच्या शौर्याचेही राजकारण केले. पाकिस्तानचे विमान पाडले असे नरेंद्र मोदींनी पुलवामा हल्ल्यांनंतर सांगितले होते, परंतु अमेरिकेने पाकिस्तानला पुरवलेली सर्व एफ-१६ विमाने जशीच्या तशी आहेत, पाकिस्तानचे कोणतेही विमान पाडलेले नाही, असे अमेरिकेने स्पष्टीकरण दिले आहे, तर मग भारताने कोणाचे विमान पाडले असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. मोदी आणि शहामुक्त भारत होण्यासाठी आपण राज्यभरात सभा घेणार असल्याची माहितीदेखील राज ठाकरे यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound