जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । 5 सप्टेंबर शिक्षक दिवसाचे औचित्य साधुन आमच्या बी.यू.एन.रायसोनी स्कूल, प्रेमनगर, जळगाव येथे स्कूलमधील इ. 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमीका निभावत पूर्ण वेळ शाळा सांभाळली.
शिक्षकांप्रमाणे वर्गावर जावून विद्यार्थ्यांनी तासिका घेतल्या.तसेच प्रत्येक वर्गातुन 3 विद्यार्थी 3 गट बनवून निवडण्यात आले. तसेच प्रत्येक गटामध्ये भाषण स्पर्धा इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही विषयांच्या घेण्यात आल्या. इ. नर्सरी ते सिनीयर के.जी. च्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त माहिती दिली. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांना व कर्मचार्यांना शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पगूच्छ व शिक्षकदिनाचे प्रेमाचे प्रतिक म्हणून भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आले.