चाळीसगाव प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा मका हा शेतकऱ्यांकडून खरेदी केला. पण काही प्रमाणात मका ओला असल्यामुळे समितीच्या आवारात सुकविण्यात टाकण्यात आला होता. मात्र अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे मका पाण्यात वाहून गेला तर राहिलेल्या मक्याला कोम आले आहेत.
शहरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. खरेदी केलेला मका काही प्रमाणात ओला राहत असल्याने तो सुकविण्यासाठी बाजार समिती आवारात पसरवून सुकविला जातो. मात्र संततधार पावसाने हा संपूर्ण मक्का ओला झाला असून काही मका वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. तर राहिलेला मक्याला कोम फुटून आहे. यामुळे मका आता वापरत्या योग्य नसल्याने बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास अडीच ते तीन हजार क्विंटल मक्याचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे. शासनाने काही स्तरावरून मदत करावी, अशी अपेक्षेची मागणी व्यापा-यांकडून करण्यात येत आहे.