https://www.facebook.com/100009798360513/videos/923865684616702/
जळगाव प्रतिनिधी । पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी आज शिवाजीनगरातील नागरिकांना रेल रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.
शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुल रहदारीसाठी बंद करण्यात आल्यामुळे हजारो नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यातच वेळेत उपचार न मिळाल्याने काही रूग्णांचा बळीदेखील गेलेला आहे. यामुळे शिवाजीनरसह पलीकडच्या भागातील जनतेसाठी पर्यायी रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीने दिला होता. या अनुषंगाने या समितीतर्फे आज सकाळी रेल रोको आंदोलन करण्यात येत आहे. पहा हे आंदोलन लाईव्ह.