गोव्यात राजकीय ड्रामा; महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपात विलीन

पणजी (वृत्तसंस्था) गोव्याचे उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीच्या दोन आमदारांनी मंगळवारी मध्यरात्री भाजपात प्रवेश करत महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचं भाजपमध्ये विलिनिकरण केल्याने गोव्यातील राजकारणात ट्विस्ट आला आहे. गोवा विधानसभेत ढवळीकरांच्या पक्षाचे केवळ तीन आमदार असून त्यातील दोन आमदार फुटल्याने आता ढवळीकर एकटेच पडले आहेत. त्यामुळे त्यांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याचे बोलले जातेय.

 

३६ सदस्यांच्या गोव्याच्या विधानसभेत १४ सदस्य हे भाजपाचे आहेत. दरम्यान, राज्यात मगोपचे एकूण तीन आमदार आहेत आणि आम्ही दोन तृतीयांश सदस्य आहोत, असे आजगांवकर आणि पावस्कर यांनी पक्ष विसर्जित करताना म्हटले आहे. त्यानुसार, मंगळवारी मध्यरात्री १.४५ वाजता विधानसभा अध्यक्ष मायकल लोबो यांच्याकडे त्यांनी मगोपच्या विलिनीकरणाचे पत्र सोपवले. त्यानंतर आज (दि.२७) दुपारी १२ वाजता भाजपात दाखल झालेल्या या दोन्ही आमदारांचा शपथविधी होणार आहे.

 

पक्षांतर कायद्यानुसार दोन तृतियांश सदस्यांनी पक्ष सोडून वेगळा पक्ष किंवा गट स्थापन केला किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास त्या सदस्यांचे सदस्यत्व कायम राहते. एमजीपीचे एकूण तीन सदस्य होते. त्यापैकी दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या दोघांचेही सदस्यत्व कायम राहणार आहे. मध्यरात्री घडलेल्या या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर ३६ आमदारांच्या गोवा विधानसभेत आता भाजपाच्या आमदारांची संख्या १२ वरुन १४ झाली आहे. त्यामुळे भाजपाच्या आमदारांची संख्या काँग्रेस आमदारांच्या इतकी झाली आहे. मगोप २०१२ पासून भाजपाचा सहकारी पक्ष होता.

Add Comment

Protected Content