Home राष्ट्रीय बिहारमध्ये रेल्वे अपघातात ९ ठार

बिहारमध्ये रेल्वे अपघातात ९ ठार

0
35

पाटणा वृत्तसंस्था । बिहारमधील हाजीपूर रेल्वे स्थानकाजवळ सिमांचल एक्सप्रेसचे डबे घसरून झालेल्या अपघातात ९ प्रवासी ठार झाले असून अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, हाजीपूर रेल्वे स्थानकाजवळून जोगबनीहून दिल्लीला जाणाऱ्या सिमांचल एक्सप्रेस जात असतांना ३.५८ वाजेच्या सुमारास या गाडीचे शेवटचे डबे अचानक घसरले. दूरपर्यंत हे डबे घसरलेल्या अवस्थेतच गेले. या अपघातामध्ये ९ जण ठार झाले असून बरेच जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे प्रशासनाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळाली नाही. तथापि, या रेल्वे गाडीचे पुढील डब्यांमधील प्रवाशांना काही झाले नाही. मात्र मागच्या डब्यांमधील प्रवासी जखमी झाले आहेत.
शेवटचे नऊ डब्बे रेल्वे ट्रॅकवरून घसरले असून हे डबे एकावर एक चढले. या अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound