यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील किराणा दुकानातून विनापरवाना प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला आणि गुटखा असा एकुण २ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल डीवायएसपी यांच्या पथकाने हस्तगत केला आहे. ही कारवाई शुक्रवारी ३ मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील किनगाव येथील अनिल किरणा दुकानात अवैधरित्या सुगंधित पान मसाला आणि गुटखा विक्री होत असल्याची गोपनिय माहिती फैजपूर येथील उपविभागीय पोलीस आधिकारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्यापथकाने शुक्रवारी ३ मे रोजी सकाळी ११ वाजता दुकानात छापा टाकला. यात सुमारे २ लाख ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल दुकानात आढळून आला. याप्रकरणी पोलीस नाईक अल्ताफ अली हसन अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किराणा दुकानदार जगन्नाथा विठ्ठल पाटील वय ५१ रा. पाटील वाडा, किनगाव ता. यावल याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीय हरीष भोये हे करीत आहे.