जुगार अड्ड्यावर छापा; ९ जणांना अटक, लाखोंचा ऐवज जप्त

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा शिवारात सुरू असलेल्या पत्ता जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ९ जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

अमळनेर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, समाधान पाटील यांच्या शेतात झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगार खेळला जात आहे. त्यानुसार अमळनेर पोलिसांनी योजनाबद्धरीत्या कारवाई करत जुगार खेळणाऱ्या व खेळवणाऱ्या ९ जणांना पकडले. या छाप्यात पोलिसांनी १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख रक्कम, ५ मोटारसायकली, १ रिक्षा आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Protected Content