धरणगाव तालुक्यात जुगार अड्डयावर धाड : जुगार्‍यांवर गुन्हा; रोकड जप्त

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील विहिरफाटा येथे हॉटेलच्या मागे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

परिविक्षाधीन डीवायएसपी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने धरणगाव तालुक्यातील विहिरफाटा येथे हॉटेल अंजनी गार्डनच्या मागील बाजूस असलेल्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकला. या छाप्यात सुरेश गोकुळ चौधरी, रा. झुरखेडा ता धरणगाव; छोटु कृष्णा चौघरी, रा.झुरखेडा; जगन्नाथ उर्फ विनोद मधुकर पाटील, रा.तरडे ता घरणगाव; ईश्‍वर संतोष पाटील रा. झुरखेडा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर याप्रसंगी नारायण लोटन भिल व विलास बळीराम चौघरी दोन्ही रा. झुरखेडा या दोघांनी पलायन केले.

या कारवाईत पोलिसांनी १७ हजार ८०० रूपये रोख आणि तीन मोटारसायकलींसह सुमारे २ लाख २ हजार ८०० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस कर्मचारी राहूल मोहन बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इसम नामे सुरेश गोकुळ चौधरी, रा.झुरखेडा ता धरणगांव, छोटु कृष्णा चौघरी, रा. झुरखेडा, ता धरणगांव, जगन्नाथ उर्फ विनोद मधुकर पाटील, रा.तरडे ता धरणगांव, ईश्वर संतोष पाटील रा. झुरखेडा, नारायण लोटन भिल व विलास बळराम चौधरी रा.झुरखेडा हे झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा पैसे लावुन खेळ खेळत असता मिळुन आले म्हणुन माझी त्याचे विरुध्द मुंबई जुगार अँक्ट कलम १२ अ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई परिविक्षाधीन डीवायएसपी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जिभाऊ तु, पाटील, पोहेकॉ/१३२९ मोती पराग पवार, ’पोहेकॉ/२२२१ सत्यवान बाबुराव पवार, पोकॉ/३०९३ शैलेश मधुकर सुर्यवशी, पोलीस उपनिरी नयन छबलाल पाटील, पोहेकॉ/१७९४ प्रविण संतोष पाटील, पोकॉ/३२५१ मुषन रतिलाल सपकाळे, पोकॉ/८२ तुषार शाम जोशी, पोकॉ/१८७५ जितेंद्र संतोष सोनवणे व पोकॉ/१९६३ हिरालाल सिताराम घुमळकर सर्व नेम.-जळगांव लालुका पोलीस स्टेशन या पोलीस पथकाने केली.

Protected Content