Home Cities चोपडा चोपड्यातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

चोपड्यातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

0
21

चोपडा प्रतिनिधी । येथील कुंटणखान्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून १६ आंबटशौकीनांसह ३२ महिलांना ताब्यात घेतले आहे.

चोपडा-धरणगाव रस्त्यावर सुरू असणार्‍या देहविक्रीच्या व्यवसायावर सायंकाळी सहायक पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या पथकाने छापा टाकला. यात १६ पुरुष व ३२ महिलांना पकडले. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी २० मोबाईल, १४ मोटारसायकली व दोन ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत. पोलिसांच्या या पथकामध्ये पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, सपोनि योगेश तांदळे, पोलिस उपनिरीक्षक यादव भदाणे, रामेश्‍वर तुरनर, अर्चना करपुडे, हेड कॉन्स्टेबल जितेंद्र सोनवणे, आसिफ मिर्झा, विद्या इंगळे, शुभांगी लांडगे, विलेश सोनवणे, जयदीप राजपूत, प्रदीप राजपूत, जितेंद्र चव्हाण, रवींद्र पाटील, शाम पवार, प्रकाश मथुरे, नीलेश लोहार, विलेचंद पवार, रवींद्र पाटील, विजय बच्छाव, संगीता पवार यांच्या समावेश होता. दरम्यान, या कारवाईमुळे आंबटशौकिनांचे धाबे दणाणले आहे.


Protected Content

Play sound