पाचोरा प्रतिनिधी । येथील कॉंग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
सोशल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अभिजीत सपकाळ आणि उत्तर महाराष्ट्र से सोशल मीडिया संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मान्यता दिल्या नंतर जळगाव जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघातील अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड केली आहे.
सदरचे नियुक्ति पत्र उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आ. प्रणतीताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. येणाऱ्या काळात कॉग्रेस पक्षाची विचार धारेला घराघरात पोहचविण्यासाठी सोशल मीडिया या प्लॅटफॉर्म्सवर आपण जोरदार काम करु असा संकल्प नुतन अध्यक्ष राहुल शिंदे यांनी घेतला आहे. या निवडीबद्दल कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष अॅड संदीप पाटील, जेष्ठ नेते प्रदिप पवार, पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.