मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा अध्यक्षपदी भाजप व शिंदे गटाचे उमेदवार राहूल नार्वेकर यांनी बाजी मारली असून त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. यात सत्ताधार्यांच्या पाठीशी १६४ इतके भक्कम बहुमत असल्याचे दिसून आले.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
महाविकास आघाडीतर्फे राजन साळवी तर भाजप व शिंदे गटातर्फे राहूल नार्वेकर यांच्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. यात आज भाजपचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत पाटील यांनी विधानसभाध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. गिरीश महाजन यांनी त्यांना अनुमोदन दिले. यात आवाजी मतदानाने त्यांनी निवड जाहीर करण्यात आली. मात्र विरोधकांनी आवाजी मतदानाची मागणी केली असून उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी याला होकार दिला.
यामुळे आता राहूल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात प्रत्यक्ष मतदान करण्यात आले. यामध्ये पहिल्यांदा राहूल नार्वेकर यांच्या बाजूने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या सदस्यांनी मतदान केले. त्यांना एकूण. . . .इतके मतदान मिळाले. तर उर्वरित मतदान हे राजन साळवी यांना मिळाले. यामुळे विधानसभाध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. यात १४४ क्रमांकाने सुहास कांदे तर मॅजिक फिगर असणार्या १४५ क्रमांकाचे मतदान हे देवदत्त कल्याणकर यांनी मतदान केल्यानंतर सत्ताधार्यांमध्ये उत्साहाची लाट उसळल्याचे दिसून आले.
राहूल नार्वेकर यांना १६४ मते मिळालीत तर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभा अध्यक्षपदी निवड जाहीर केली. तर शिवसेनेच्या शिंदे गटाने पक्षाचा व्हीप मानला नसल्याने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी असे देखील त्यांनी याप्रसंगी निर्देश दिलेत. नरहरी झिरवाळ यांनी मतदान संपल्यानंतर विधानसभाध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची निवड झाल्याचे घोषीत केले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या आसनाकडे नेले. यानंतर त्यांनी लागलीच अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
आजच्या विधानसभाअध्यक्षपदाच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन तर मनसेच्या एक उमेदवाराने राहूल नार्वेकर यांना मतदान केले. तर समाजवादी पक्षाचे दोन आमदार हे तटस्थ राहिले. उद्या अर्थात सोमवार दिनांक ४ जुलै रोजी शिंदे सरकार बहुमत चाचणी घेणार आहे. याआधीच विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचे उमेदवार राहूल नार्वेकर यांनी बाजी मारल्याने उद्याच्या चाचणीतही शिंदे सरकार सहजपणे बहुमत सिध्द करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आजच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी काढलेला व्हीप हा एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी धुडकावून लावल्याचे देखील दिसून आले आहे.