राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला

Rahul Gandhi Nomination

 

केरळ (वृत्तसंस्था) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केरमळमधील वायनाड मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बहिण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या.

 

राहुल गांधी यावेळी पारंपारिक मतदारसंघ अमेठी आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अमेठीत राहुल गांधींचा सामना भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याशी असणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी स्मृती इराणी यांना पराभव स्विकारावा लागला होता.

Add Comment

Protected Content