जळगाव प्रतिनिधी । पाणी पुरी हा तोंडाला पाणी सुटणारा सर्वांचा जिव्हाळ्याचा खाद्यपदार्थ असला तरी याच्या स्टॉल्सवरील अस्वच्छतेमुळे अनेकांना इच्छा असूनही याचा आस्वाद घेता येत नाही. या पार्श्वभूमिवर जळगावातील ‘राधे पाणी पुरी कॉर्नर’ या स्टॉलवरील पाणी पुरीत मिनरल वॉटर वापरले जात असून याचमुळे ग्राहकांची याला पसंती मिळाली आहे.
सध्या कुणालाही चटपटीत स्वाद हवा असला तरी याच्या जोडीला स्वच्छतादेखील हवी असते. यामुळे स्वच्छ वातावरणाला सातत्याने प्राधान्य दिले जाते. पाणी पुरीचा विचार केला असता जळगावात अनेक स्टॉल्सवर अतिशय लज्जतदार पाणी पुरी मिळते. यातील राधे पाणी पुरी कॉर्नर या स्टॉलवर तर चक्क मिनरल वॉटरमध्ये पाणी पुरी तयार करण्यात येते. येथे स्वच्छता, टापटीप आणि स्वाद यांचा त्रिवेणी संगम असल्याने ग्राहकांची या स्टॉलवर नेहमीच वर्दळ आढळून येते.
जयकिसन वाढीतील मुख्य रस्त्यावर दररोज सायंकाळी राधे पाणी पुरी कॉर्नर हा स्टॉल लागतो. याचे संचालक हितेश व्यास हे आपल्या सौभाग्यवतीसह याला चालवतात. त्यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी हा स्टॉल सुरू केला आहे. आपण सहकुटुंब बाहेर खाण्यासाठी जातो तेव्हा स्वच्छता आवर्जुन बघतो. यामुळे ग्राहकांना स्वच्छतेचे पालन करून दर्जेदार खाद्य पदार्थ पुरवण्याच्या हेतूने त्यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी हा स्टॉल सुरू केला. यासाठी आयओए वॉटर प्युरिफायरच्या मिनरल वॉटरचा वापर करण्यात येतो. त्यांच्याकडे सध्या पाणी पुरी, शेव पुरी आणि भेळ हे तीन खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत. लवकरच दहीपुरी व दाबेलीसह अन्य पदार्थ ग्राहकांना उपलब्ध करण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी हितेश व्यास हे सकाळी पाच वाजताच उठून साधारणत: आठ वाजेला बाजारात खरेदी करण्यासाठी जातात. दुपारी तीन-साडेतीनला परत आल्यानंतर थोडी विश्रांती घेऊन साधारणत: पाच वाजेच्या सुमारास स्टॉल लावतात. हा स्टॉल रात्री दहापर्यंत सुरू असतो. याला जळगावकरांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. यात हितेशजींना त्यांच्या सौभाग्यवती पुष्पा व्यास यांचा चांगला सपोर्ट मिळाला आहे. त्या स्वत: स्टॉलवर असतात. सर्वप्रथम त्यांनी स्वत: वास्तव्यास असणार्या गल्लीत पाणी पुरीचा स्टॉल लावला होता. याला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी राधे पाणी पुरीया माध्यमातून व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवली असून याला मिळालेल्या प्रतिसादाने त्या उत्साहीत झाल्या आहेत.
संपर्क
राधे पाणी पुरी कॉर्नर
पद्मावती मोबाईल जवळ, जयकिसन वाडी
जळगाव
पहा : राधे पाणी पुरी कॉर्नरबाबतचा हा व्हिडीओ रिपोर्ट.
गुगल मॅप्सवर पहा अचूक लोकेशन