जळगावात संस्कार परिवारातर्फे शुक्रवारी “राधा जन्मोत्सव”

धर्म अध्यातम 21 सितंबर को राधा अष्टमी राधा उपासना से लक्ष्मी का वरदान 109549

जळगाव, प्रतिनिधी | येथील संस्कार परिवारतर्फे शहरात राधा जन्मोत्सवाचा कार्यक्रम रिंगरोड येथील महेश प्रगती मंडळ येथे शुक्रवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

“राधा जन्मोत्सव” कार्यक्रम गेल्या ६ वर्षापासून आयोजित होत असून यंदा सातवे वर्ष आहे. कार्यक्रमात विष्णूस्तुती, विविध नृत्य, भजन महिला सादर करणार आहे. २१ भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे कृष्ण व राधेची महारास या कार्यक्रमात राहणार आहे. सामाजिक विषय आणि आजच्या विविध क्षेत्रातील समस्यांवर नाटिकादेखील सादर होतील. त्यातून प्रबोधन करण्याचा उद्देश राहील. सुमारे २०० ते २५० महिला वर्गाचे पूर्ण कार्यक्रमात सादरीकरण होणार आहे. युवाशक्ती फौंडेशनतर्फ ढोलताशांचे प्रात्यक्षिक राहणार आहे. तसेच गौरी गणपतीचे आगमन होवून स्थापना केली जाणार आहे. महिला मंडळांचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात सहभाग आहे. कार्यक्रमात अधिकाधिक महिलांनी व मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्कार परिवारतर्फे करण्यात आलेले आहे.

Protected Content